अजिंक्य फू-मांच्यू: Ajinkya Fu-Manchyu

अजिंक्य फू-मांच्यू: Ajinkya Fu-Manchyu
Author: Baburao Arnalkar
Published: July 28th 2017 by BookHungama
Goodreads Rating: 3.00
ASIN B074CXX7JQ
Pages: 141

‘तुम्हांला नेलँड स्मिथकडून अगदी शेवटचे असे पत्र कधी आले होते?’ माझ्या पाहुण्याने विचारले. मी क्षणभर विचार करून म्हणालो, ‘दोन महिन्यांपूर्वी. मला वाटते त्याला पत्रव्यवहाराचा कंटाळा असावा. शिवाय तो चांगल्या मनःस्थितीत नसावा असे दिसते.’ ‘काही आईची भानगड आहे की काय?’ पाहुण्याने विचारले. ‘तसेच असावे. पण तो मला दाद लागू देणार नाही.’ मी उत्तर दिले. माझे पाहुणे रेव्हरंड एल्थाम हे चीन देशामध्ये “बंडखोर मिशनरी” या नावाने प्रसिद्ध होते. हाच एरव्ही शांत दिसणारा माणूसच बॉक्सरच्या बंडाचा जनक होता. ते म्हणाले, ‘पेट्री, माझ्या मनात त्या भयंकर चिनी माणसाबद्दलचे विचार वारंवार येत असतात. जर डॉक्टर फू-मांच्यू जिवंत असला तर जागतिक शांततेला अद्यापही धोका आहे.